आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू आहे : प्रीती मेनन


“आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू आहेत. त्यांच्या आरे बचाव मोहिमेबाबत वापरलेल्या शब्दांचा आणि कृतीचा परस्पर संबंध नाही” अशी बोचरी टीका आपच्या प्रीती मेनन यांनी ट्विटर अकाऊंटवरुन  ट्विट करत केली आहे तसेच #PappuThackery हा हॅशटॅगही ट्रेन्ड केला आहे.
@terence_fdes या अकाऊंटवरुन आरे बचाव संदर्भातलं ट्विट करण्यात आलं आहे. ते रिट्विट करताना त्याला दिलेल्या उत्तरात आपच्या प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरेंना पप्पू ठाकरे असं संबोधलं आहे. पप्पू हे संबोधन भाजपा नेत्यांनी कायमच राहुल गांधी यांच्याबाबत वापरलं आहे. आता मात्र आपच्या प्रीती मेनन यांनी राहुल गांधी यांना नाही तर आदित्य ठाकरेंना पप्पू असं म्हटलं आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख प्रीती मेनन यांनी पप्पू ठाकरे असाही केला आहे. प्रीतीन मेनन यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post