पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन


एएमसी मिरर : वेब न्यूज
दक्षिण आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले आहे. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईन आहे. मोतीहारी ते अमलेखगंज या दोन्ही शहरांमधील ही पाईपलाईन भारत आणि नेपाळच्या मैत्रीचे प्रतीक ठरेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय स्वरूपाची पाईपलाईन विक्रमी वेळेत पूर्ण झाली हा आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. नियोजित वेळेपेक्षा आधीच ही पाईपलाईन पूर्ण झाली आहे.
१९९६ मध्ये पहिल्यांदा या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलसाठी पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या नेपाळ भेटीमध्ये या पाईपलाईनच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post