पाकिस्तानमध्ये हिंदू मुलगी पोलीस खात्यात


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात राहणाऱ्या एका हिंदू मुलीची प्रथमच पोलीस खात्यात नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी पोलीस अधिकारी बनली आहे. पुष्पा कोहली यांची नेमणूक असिस्टंट सब इन्स्पेक्टर (एएसआय) पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा दिली. यात यश संपादन करून पोलीस विभागात एएसआय पदावर रुजू झाल्या आहेत.
पुष्पा कोहलीची या पदावर नेमणूक झाल्याची बातमी पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी दिली. त्यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे. ते म्हणतात, सिंध लोकसेवा आयोगाच्य माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन असिस्ंटट सब इन्स्पेक्टर बनणारी ही इथल्या हिंदू समुदायामधली पहिलीच मुलगी आहे.
पाकिस्तानमध्ये सुमारे ७५ लाख हिंदूधर्मीय राहतात. ते इथे अल्पसंख्य आहेत. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात हिंदू समुदायामधल्याच सुमव पवन बोडानी पाकिस्तानच्या पहिल्या महिला जज बनल्या होत्या. त्या सिंध प्रांतात राहणाऱ्या आहेत. त्यांनी न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या मेरिट लिस्टमध्ये ५४ वा क्रमांक मिळवला. मार्च २०१८ मध्ये पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णाकुमारी यांनी संसदेची निवडणूक जिंकली होती. हिंदू समुदायातून येऊन खासदार बनलेल्या त्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या. तर आता पुष्पा कोहली या पोलीस खात्यात भरती होणाऱ्या पहिला हिंदू महिला आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post