'गड-किल्ल्यांना हात लावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील'


एएमसी मिरर : वेब न्यूज
युती सरकारच्या गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सडकून टीका केली आहे. सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी गड-किल्ले धोरणाचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, “महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास लाभला आहे. मात्र सरकारला याच्याशी काहीही देणंघेणं नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत. भाजप मशीनच्या मदतीने निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत.”

Post a Comment

Previous Post Next Post