एएमसी मिरर : वेब न्यूज
आम्ही अमूक जागा देतो असे म्हणणारे प्रकाश आंबेडकर टिव्ही आणि वर्तमानपत्रात चर्चेत राहून जनतेची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे होती आणि आताही त्यांना वेगळेच लढायचे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. वंचितमुळे मतविभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होतो.
Post a Comment