'एवढे येऊ नका की, आम्हालाच पक्षाबाहेर काढाल'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
भाजपमध्ये सध्या मेगाभरती चालू आहे. नुकतेच इतर पक्षातील चार आमदार भेटून गेले. त्यांना सांगितले की, थोडे थांबा आणि प्रतीक्षा करा. एवढे येऊ नका की, आम्हालाच काढून टाकाल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे ओबीसी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सांगितले.
ते म्हणाले, सर्व समाजघटकांना स्थान देणारा पक्ष आहे. विधान परिषदेवर सहा सदस्य घेताना मराठा समाजातील राम रातोळीकर वगळता अन्य पाच सदस्य आम्ही बंजारा, कोळी, धनगर, ठाकूर आणि आगरी समाजातून घेतले. सरपंच,

आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि दोनदा केंद्रीय राज्य मंत्रिपद पक्षाने दिले. राजकारणात अपेक्षा कधी संपत नसते म्हणून पक्षाने मला पंतप्रधान करायचे की काय, त्यावर सभागृहात मुख्यमंत्री व्हा, असा आवाज आला. त्यानंतर दानवे म्हणाले, सध्या मुख्यमंत्री आपलेच आहेत आणि यापूर्वी मराठवाडय़ातील मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री जालना जिल्ह्य़ाचा हवा, असा आवाज आला आणि त्यावर हसत-हसत पुढच्या काळात विचार करू, असे दानवे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post