लाभार्थ्यांना गरज असेपर्यंत आरक्षण ठेवायला हवे : आरएसएस


एएमसी मिरर : वेब न्यूज
लाभार्थ्यांना आरक्षणाची गरज असेपर्यंत आरक्षण सुरुच ठेवायला हवे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले. संविधानाद्वारे निश्चित केलेल्या आरक्षण व्यवस्थेला रा. स्व. संघ पूर्णपणे समर्थन आहे, असेही ते म्हणाले.
राजस्थानातील पुष्कर येथे संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत आरक्षणावर चर्चेवेळी ते बोलत होते.
होसबळे म्हणाले, आरक्षणाची आवश्यकता आहे कारण समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. त्यामुळे आरक्षण तोपर्यंत कायम ठेवायला हवे जोपर्यंत याचा लाभ घेणाऱ्यांना त्याची गरज वाटते आहे. मंदिर, स्मशानभूमी आणि जलाशये सर्व जाती आणि वर्गांसाठी खुले व्हायला हवेत. कोणत्याही विशिष्ट जातीच्या व्यक्तीला तिथे जाण्यापासून प्रतिबंध करता कामा नये. एका दलित संघटनेच्या प्रमुखाने संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून समाजातील भेदभाव संपवण्याच्या संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post