'राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार'



एएमसी मिरर : वेब न्यूज 
पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही, अशी मोदींवर स्तुतीसुमने उधळणा-या रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जर राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार? याची परिणीती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली, असे आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यावरून केंद्रीय मंत्री आणि रिपाइ नेते रामदास आठवले यांनी बोचरी टीका केली.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली असताना 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणी नुकतीच केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात एवढ्या जागा आरपीआयला सुटण्याची चिन्हे नाहीत. तर एवढ्या जागा मिळून महायुतीतील घटकपक्षांनाही मिळणार नसल्याची स्थिती आहे. आचारसंहिता लागू झाली असली तरी महायुतीची घोषणा अद्याप व्हायची आहे.
 


 

Post a Comment

Previous Post Next Post