एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारत पर्यायवाची असून आणि पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संताप व्यक्त करत असेल तर तो भारतावरही संताप असेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरचिटणीस कृष्णगोपाल यांनी आज सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ भारतातच आहे.त्याची शाखा इतरत्र जगात कुठेही नाही. जर पाकिस्तान आमच्यावर संताप व्यक्त करत असेल, तर तो भारतावर होईल. संघ आणि भारत पर्यायवाची झाले असल्याचे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कृष्णगोपाल यांनी हे व्यक्त केले.भारताच्या माजी गृहमंत्र्यांनी संघावर दहशतवादाचा आरोप केला होता. याला अधोरेखित करून खान यांनी हे वक्तव्य केले होते.
Post a Comment