एएमसी मिरर : वेब न्यूज
नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या भागाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे. भारत अति पूर्वेकडच्या भागाच्या विकासासाठी रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
दोन्ही बाजूंच्या सरकारी संवादापुरती भारत आणि रशियामधील मैत्री मर्यादीत नसल्याचे ते म्हणाले. मोदी सध्या दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियाच्या अति पूर्वेकडच्या भागाबरोबर भारताचे फार जुने नाते आहे.
व्लादिवोस्तोकमध्ये दूतावासा सुरु करणारा भारत पहिला देश आहे. लोकांचे रस्परांशी असलेले नाते, दृढ आर्थिक संबंधही त्यामध्ये आहेत असे मोदी इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत म्हणाले. सोवियत रशियाच्यावेळी जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता. संरक्षण आणि विकासासंबंधीचे मोठ्या प्रमाणावर सामान व्लादिवस्तोकच्या माध्यमातून भारतात पोहोचत होते. याच भागीदारीचा वृक्ष आजही आपली मुळे घट्ट करीत आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.
भारत-रशिया सहकार्यासाठी मी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, हे संबंध केवळ राजकीय पातळीवर न राहता उद्योग क्षेत्रातील सहकाऱ्यापर्यंत नेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आम्ही ‘सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्राद्वारे नवभारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहोत. २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रिलिअन इकॉनॉमी बनवण्याच्या अभियानातही आम्ही स्वतःला वाहून घेतले आहे असे मोदींनी सांगितले.
Post a Comment