बुद्ध उपयोगाचा नाही; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर संभाजी भिडेंचा आक्षेप


एएमसी मिरर : वेब न्यूज
विविध वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर संभाजी भिडेंनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी चुकीचं बोलले असल्याचंही भिडेंनी म्हटलं.
नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये संभाजी भिडे सहभागी झाले होते. यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपलं आहे. "देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत', असं संभाजी भिडेंनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post