एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील पाच वर्षात शहरात अनेक कामे केली. धूळखात पडलेल्या आयटी पार्कमध्ये कंपन्या आणून युवकांसाठी रोजगार उपलब्ध केला. त्यामुळे धसका घेतलेल्या विरोधकांनीच त्यांच्या पक्षांतराबाबत अफवा पसरविल्या. मात्र, संग्राम जगताप हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच उमेदवार राहतील, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी पत्रकार परिषद घेउन केला आहे.
पक्षांतराच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, स्वत: संग्राम जगताप यांनीही कधी याबाबत वक्तव्य केलेले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस बाबासाहेब गाडळकर उपस्थित होते.
Post a Comment