उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात?


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशात उदयनराजेंनी भाजपा प्रवेशाआधी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा येथील लोकसभेची पोटनिवडणूकही त्याचवेळी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात असून, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. तसेच एक उमेदवार गेला तरीही दुसरा उमेदवार आमच्याकडे तयार आहे, असाही टोला त्यांनी राजेंना लगावला. आता सातारा पोटनिवडणुकीत जर पृथ्वीराज चव्हाण यांनी लढायचं मान्य केलं, तर ही लढत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी होईल.

Post a Comment

Previous Post Next Post