पवार कुटुंबात वाद नाहीत, गैरसमज पसरवू नका : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पवार कुटुंबात वाद निर्माण झाल्याबाबत चर्चा झडू लागली आहे. याविषयी शरद पवार यांनी मात्र, पवार कुटुंबात यत्किंचीतही वाद नाही. पवार कुटुंबात कौटुंबिक कुठलेही निर्णय माझे असतात. आम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या कुटुंबाची जी परंपरा आहे ती कायम राहील, असे स्पष्ट केले आहे.
आम्ही सगळेजण एका विचाराने वागतो. आमच्या घरात कुटुंबप्रमुखांचा शब्द अंतिम असतो. माझ्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कुठलेही निर्णय माझे असतात आणि त्याचा सन्मान सगळे करतात. आम्ही दिवाळीला सगळे एकत्र जमतो आणि पुढच्या वर्षीच्या कमाविषयीची चर्चा करतो. त्यात काही विषय आले, तर माझा निर्णय अंतिम असतो आणि तो इथून पुढेही तोच अंतिम राहील, असेही ते म्हणाले. कृपया करून कुटुंबाविषयी काही गैरसमज पसरवू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. 

Post a Comment

Previous Post Next Post