एएमसी मिरर : वेब न्यूज
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे सुरु झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. मंगळवारपासून (१७ सप्टेंबर) शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरूवात सोलापुरातून होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची मनधरणी तसेच सर्वसामान्यांशी संवाद साधतील .
शरद पवार यांच्या दौऱ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत
ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे . या ट्विटमध्ये पवार यांच्या राज्यव्यापी
दौऱ्या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली . पवार यांच्या दौऱ्याला
मंगळवारी सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड
लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत
बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
Post a Comment