शेअर बाजार सुसाट; १८०० अंकांनी वधारला


एएमसी मिरर : वेब न्यूज
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मरगळलेल्या शेअर बाजारात तेजी आली. बीएसईचा प्रमुख निर्देशांक १८०० अंकांनी उसळून ३७,७६७.१३ वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात सुरू असलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे थोडीबहुत दूर झाली.
या तेजीत बँकिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सेन्सेक्स सर्व ३० शेअर्सच्या उसळीनंतर १८०० अंकांनी वधारला. निफ्टी ११,००० वर पोहोचला. निफ्टीच्या ५० पैकी ४९ शेअर्समध्ये तेजी आहे.
शेअर बाजारात ही २० मे नंतर आलेली सर्वात मोठी तेजी आहे. यापूर्वी लोकसभेच्या ‘एक्झिट पोल’च्या वेळी शेअर बाजार उसळला होता.

Post a Comment

Previous Post Next Post