शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; रविवारी घोषणा शक्य


एएमसी मिरर : वेब न्यूज
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा निर्णय आणि त्यादृष्टीने जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेला १२६ जागा तर भाजपा आणि मित्रपक्षांना १६२ जागा असा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी (दि.२२) भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत असून, त्यांच्या उपस्थितीतच युतीची घोषणा होईल, असे सांगण्यात येत आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा होऊन युतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या किती जागा लढणार आहोत यासंबंधी आपण सांगू शकत नाही. सध्या अंतिम चर्चा सुरु आहे. चर्चा सकारात्मक सुरु असून युती होईल. पण समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही,” असे अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या बैठकीपूर्वी बोलतांना म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post