'यंदा शिवसेनेची यादी मुख्यमंत्र्यांनीच तयार करावी..'


एएमसी मिरर : वेब न्यूज
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’ येथे केली. त्याचवेळी त्यांनी ‘मी यंदा वेगळा मार्ग सूचवला आहे’, असे म्हणत पत्रकारांच्या जागावाटपाच्या प्रश्नावर मिश्कील उत्तर दिले. ‘यंदा शिवसेनेची यादी मुख्यमंत्र्यांनीच तयार करावी, असं मी त्यांना सांगितले आहे. मग ती यादी शिवसैनिकांसमोर ठेवेन’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी लढवय्या शिवसैनिक स्वगृही परतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी भास्कर जाधव यांचं कौतुक करून त्यांनी शिवबंधन बांधलं.
राष्ट्रवादीत माझं भांडण नाही, कोणावर आक्षेप नाही, मी मुळचा शिवसैनिक आहे. माझा मूळ स्वभाव, अंतरात्मा शिवसैनिकाचा तो स्वस्थ बसू देत नव्हता, असं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं. मधल्या काळात गैरसमज झाल्याने, माझी समज तेव्हा कमी होती म्हणून बाहेर गेलो होतो. मात्र आता मी पुन्हा शिवसेनेत दाखल झालो आहे, असं ही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post