शिवसेनेतील इच्छुकांना 'मातोश्री'वरून बोलावणे; १८ सप्टेंबरला मुलाखती


एएमसी मिरर : नगर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांना 'मातोश्री'वरुन बोलावणे आले आहे. १८ सप्टेंबरला त्यांच्या मुलाखतीची प्रक्रीया पार पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या निरीक्षकांनी शासकीय विश्रामगृहावर शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच विधानसभा लढविणास इच्छुक असणाऱ्यांची मते जाणून घेतली होती. शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे आदींनी यावेळी उमेदवारीची मागणी केली होती. या चौघांना आता १८ सप्टेंबरला मुंबईत 'मातोश्री'वर मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post