शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर निवासस्थानी पोहचले आहेत. अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी आमदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून दिलं. पत्रकार परिषदेत ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. अजित पवार काय बोलणार? याची उत्सुकता वाढलेली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दुसरीकडे काही वेळापूर्वीच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात युती होणारच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post