शिवसेनेचा मेट्रोला नाही, तर कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध : आदित्य ठाकरे


एएमसी मिरर : नगर 
आरे जंगलातील वृक्षतोड करून तेथे मेट्रोचे कारशेड तयार करण्याविषयी प्रस्तावावर भाजप शिवसेनेत कुजबूज सुरू आहे. एकीकडे भाजप नेते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी या कारशेडसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे शिवसेना युवासेना प्रमुख यांनी आरेमधील वृक्षतोडीसाठी विरोध केला आहे.
शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.
“मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. ही कारशेड अन्यत्र हलवावी लागली तर, हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही,” अशी शक्यता व्यक्त केली आहे. कारशेडसाठी आरेऐवजी कांजूरमार्गचा प्रस्ताव पुढे केला जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. तर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा शहराचा आत्मा आहे. त्यामुळे त्याच्या सक्षमीकरणासाठी मेट्रो गरजेची आहे. मेट्रोमुळे प्रदुषणाच्या पातळीत मोठी घट होणार असून तोडलेल्या झाडांपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे,’ असे म्हटले आहे.
तर, तज्ञांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आरे चं महत्त्व पटवून दिलं आहे. आरे मध्ये सापडलेले वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post