ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात सहा ठार, 20 जखमी


एएमसी मिरर : वेब न्यूज
पुणे-बंगळुरु महार्गावरील सातारा येथे डी मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला दिलेल्या धडकेत बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवास जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या बसमधील प्रवासी कर्नाटकमधील असल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक सातारा शहराजवळच्या खंडेवाडीजवळून जात असताना ट्रकचे टायर फुटले. ट्रक चालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. मात्र त्याचवेळी ट्रक मागून वेगाने येत असलेल्या ट्रॅव्हल बसने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post