स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार स्वस्तएएमसी मिरर : वेब न्यूज
बँकांनी कर्जावरील व्याजदर रेपोदरानुसार कमी-अधिक करावा. अलिकडे सलग चार वेळा रेपोदर १.१० टक्के कमी केला आहे. पण स्वत:ला रिझर्व्ह बँकेकडून कर्ज स्वस्तात मिळत असतानाही त्याचा लाभ बँका कर्जदारांना देत नसल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तशी तंबीही दिल्यानंतर आता स्टेट बँकेने गृहकर्ज स्वस्त केले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या कर्जधारकांसाठी एक खूशखबर आहे. बँकेने सर्व कालावधीच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट कमी केले आहेत. एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के कपात केली असून, व्याजदर ०.१० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे.
स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’ या जुन्या पद्धतीनेच व्याजदर कपात केली आहे. त्यांनी भले रेपोदरानुसार कर्जावरील व्याजदर कमी केलेले नाहीत. पण हा निर्णयही बँकेने रिझव्र्ह बँकेच्या दट्ट्या आल्यानंतरच घेतला आहे.
‘एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट कमी केला आहे. बँकेचा एमसीएलआर ८.२५ टक्क्यांहून ८.१५ टक्क्यांवर आला आहे. पण यामुळे मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी झाले आहेत. मंदीदरमंयान कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवे दर १० सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post