देवळाली प्रवरात 19 लाख 52 हजारांची विदेशी दारु पकडली


एएमसी मिरर : नगर
देवळाली प्रवरा येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने महिंद्रा पिकअप व मारुती सुझुकी इर्टिगा कारमधून चोरट्या मार्गाने केली जाणाऱ्या दारु वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 19 लाख 52 हजार 560 रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपी रिजवान खालीद इनामदार (रा. कोकणगाव ता. संगमनेर) व समीर सांडू शेख (रा. माजिद नगर, ता.संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे. इतर दोन आरोपी पसार झाले आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 या श्रीरामपूरच्या पथकास चोरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचला. देवळाली प्रवरा शिवारात भारत पेट्रोल पंपाच्या समोर रिजवान खालीद इनामदार व समीर सांडू शेख हे दोघे महिंद्रा पिकअप (एमएच 09 बीसी 4653) व मारुती सुझुकी इर्टिगा कारधून (एमएच 14 इसी 4845) विदेशी दारु चोरुन वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून मॅकडॉल व्हिस्की विदेशी मद्याचे 375 मिली व 750 मिली असे एकूण 45 विदेशी मद्याचे बॉक्स, असा 19 लाख 52 हजार 560 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
श्रीरामपूरचे प्रभारी निरीक्षक सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक पी. बी. अहिरराव, दुय्यम निरीक्षक के.यु. छत्रे तसेच कोपरगाव विभागाचे निरीक्षक बी.टी. घोरतळे, ए.व्ही.पाटील, नगर विभागाचे निरीक्षक ए. बी. बनकर, कॉन्स्टेबल राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, निहाल उके व महिला जवान संगीता जाधव, वर्षा जाधव यांनी कामगिरी बजावली.
आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) (ड) 80, 81, 83 व 90, 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post