अमित शहा खोटारडे, 370 विरोधात मतदान केले नाही : सुप्रिया सुळे


एएमसी मिरर : वेब न्यूज
गृहमंत्री अमित शहा धादांत खोटे बोलत असून मी जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटविण्याविरोधात मतदान केले नसून याबाबत तुम्ही संसदेचे रेकॉर्ड पाहू शकता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार युप्रिया सुळे यांनी केली आहे.
अमित शहा यांनी ३७० कलमावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला करताना सोलापूर येथे भाजपच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या विरोधात मतदान केल्याचा दावा केला होता. त्यानंतर शहा यांची सभा संपताच सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना शहा हे खोटे बोलत असल्याचा आरोप केला. शहा खोटे बोलत आहेत, मी ३७० कलमच्या मतदान प्रक्रियेत भागच घेतला नव्हता. कुणीही संसेदचे रेकॉर्ड पाहू शकता, असे सुळे यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post