स्विस बँकेने भारताला दिली खातेधारकांची माहिती


एएमसी मिरर : वेब न्यूज
स्विस बँकांत पैसे ठेवणार्‍या भारतीयांच्या खात्यांची माहिती भारताला मिळण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्यात स्वित्झर्लंडने पहिल्यांदा काही माहिती भारताला उपलब्ध करून दिली आहे. या माहितीच्या विश्‍लेषणाची तयारीही भारताने सुरू केली आहे.


खातेधारकांची ओळख पटण्यासाठीच्या आवश्यक बाबी यात अंतर्भूत असल्याचा अंदाज लावला जात आहे. काही लोकांनी कारवाईच्या भीतीने स्विस बँकांतील खाती गोठवली होती आणि प्राप्त माहिती अशा खात्यांशीही निगडित आहे. साहजिकच दडपण्याचा प्रयत्न केलेली अनेक रहस्ये आता उघडकीला येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या निर्देशाबरहुकूम तिथल्या बँकांनी डेटा एकत्रित केलेला आहे आणि भारताच्या सुपूर्द केलेला आहे. 2018 या वर्षात एकदा जरी एखादे खाते सक्रिय झालेले असेल, तर त्याचीही संपूर्ण माहिती भारताला मिळालेली आहे, असेही सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post