जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद, शिक्षकांच्या संपास चांगला प्रतिसाद


एएमसी मिरर : नगर
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या व जुनी पेन्शन बचाव कृती समितीच्यावतीने 9 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाची हक देण्यात आली होती. या संपास जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकतेर कर्मचार्‍यांनी शालेय कामकाज बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या संपाबद्दल जुनी पेन्शन बचाव कृती समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, कृती समितीचे संयोजक चंद्रकांत चौगुले, शिक्षक परिषदेचे सखाराम गारुडकर, प्रशांत म्हस्के, एस. एस. बांगर, शरद दळवी आदिंसह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. या संपास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागाने पाठिंबा दिला.
सुनिल पंडित म्हणाले, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना चालू करावी. या आमच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यात शिक्षक परिषद व कृती समितीच्यावतीने संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होऊन संप यशस्वी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शाळा बंद आहे.
पेन्शन बचाओ कृती समितीचे चंद्रकांत चौगुले म्हणाले, ज्ञानदान करुन विद्यार्थी घडविणार्‍या शिक्षकांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडे वारंवार मागणी करुनही मागण्या मान्य होत नाहीयं. त्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी हे संपाचा निर्णय घेतला आहे. आता तरी सरकारने जागे होवून त्वरित जुनी पेन्शन लागू करावी, अन्यथा यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.
यावेळी श्रीकृष्ण पवार, नि.गो.केणे, दि.बा.मुळे, विठ्ठल उरमुडे, सुभाष येवले, नवनाथ ठोंबरे, सौ.नगरकर, रघुनाथ ठोंबरे, अन्सार शेख, शेखर उंडे, आदिंसह शिक्षक सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post