'झिनटॅक'वर तात्पुरती बंदीएएमसी मिरर : वेब न्यूज
ऍसिडिटी वर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘झिनटॅक’ गोळीवर केंद्रीय औषध नियामक मंडळाने बंदी टाकली आहे. या गोळ्या भारतात विकता येणार नाही. या गोळीतील ‘रेनिटिडीन’ मुळे कॅन्सर होऊ शकतो असे आढळल्याने तिच्यावर बंदी टाकण्यात आली आहे. तिची विक्री तात्पुरती थांबण्यात आली आहे. या गोळ्यांचा बाजारातील साठा कंपनीने मागे घेतला आहे.
केंद्रीय औषध नियामक मंडळाने शुक्रवारी काढलेल्या पत्रकामधून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय औषध नियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी या औषधांमध्ये काही प्रमाणात एनडीएमए हा घटक आढळल्यामुळे या गोळ्या आरोग्यासाठी सुरक्षित नाहीत, असे म्हटले आहे. कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे यासंदर्भात राज्यातील औषध उत्पादकांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
 


 

Post a Comment

Previous Post Next Post