'पक्षांतर्गत वादातून जलील यांच्याकडून परस्पर भूमिका जाहीर'


एएमसी मिरर : वेब न्यूज
‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्यासोबत अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू असताना खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ओवेसींसाठी जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती झाली आहे. त्यंच्या पक्षातील अंतर्गत वादातून जलील यांनी परस्पर ही भूमिका जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता सचिन माळी यानी केला आहे.
जागा वाटपाबाबत माळी म्हणाले, एमआयएमकडून अधिकृतपणे केवळ 17 जागांचा प्रस्ताव आला होता. तर दुसरीकडे जलील यांनी आघाडीकडून एमआयएमला केवळ सात जागा मिळत असल्याने इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले. यापूर्वी कधीही शंभर जागांचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या जागांविषयी चर्चा झालेली नाही. परंतू जलील यांनी त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षापोटी स्वत:च्या लेटर हेडवर आघाडीतून बाहे पडल्याचे जाहीर केले आहे. जलील यांची भूमिका म्हणजे एमआयएमची भूमिका नसल्याचे माळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या पातळीवर अजून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. मुस्लिमांसह सर्व समाजाला योग्यपध्दतीने प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. पण जलील यांच्याकडून फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post