'युतीचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला ठरला नाही'

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
आमचं ठरलंय म्हणत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात युतीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेची आगामी विधानसभेत युती होणार की नाही याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी पुन्हा युतीचा 50-50 फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत ५०-५० फॉर्म्युला ठरल्याचे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याला महाजन यांनी टोला लगावला.
महाजन याप्रसंगी म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला   राहणार असल्याचेही ते म्हणाले.
विधानसभेत उत्तर महाराष्ट्रातील 100 टक्के जागा निवडणून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. फार तर फार यात ४-५ जागांवर कमी पडू इतर मात्र सर्वच जागांवर विजयी होऊ असा विश्वास असल्याचे महाजन म्हणाले.
जास्त मतांनी निवडणून येणाऱ्या उमेदवारांनाच यंदा तिकीट देण्याचा विचार पक्ष करणार आहे. तसेच गेल्या पंचवार्षिकची मते तसेच गेल्या पाच वर्षांतील उमेदवाराचा मतदारसंघ याचाही अभ्यास करून उमेदवारी घोषित होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post