चिखलठाणा : एकाच कुटुंबातील तिघांची हत्या


एएमसी मिरर : वेब न्यूज
एकाच कुटूंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत बुधवारी (दि.२५) रात्री आठ वाजेदरम्यान ही घटना घडली.
दिनकर भिकाजी बोराडे (५५), कमल दिनकर बोराडे (५०), भगवान दिनकर बोराडे (२५) अशी कुटुंबातील तिघांची नावे आहेत. हे तिघे घरात असताना त्यांच्याच परिसरातील अमोल बोर्डे हा तरुण त्यांच्या घरात घुसला. धारदार शास्त्राने तिघांवर त्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आई, वडील व मुलाचा मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सुरेश जारवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अमोल बोर्डे ला एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. घटनेचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

Post a Comment

Previous Post Next Post