उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती


एएमसी मिरर : वेब न्यूज 
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी दोन विशेष पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून हे दोन्ही अधिकारी निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणार आहेत. हे पर्यवेक्षक महसूल खात्याचे माजी आयआरएस-1982 अधिकारी मधू महाजन आणि माजी आयआरएस-1983 अधिकारी बी मुरली कुमार हे असतील. ते सर्व खर्चावर लक्ष ठेवतील.
भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला निकाल घोषित केला जाणार आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. 27 सप्टेंबरला अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर अर्ज माघारी घेण्याची तारिख 10 ऑक्टोबर असणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये ठेवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post