मला पळायला लावू नका; उदयनराजेंची भाजपा कार्यकर्त्यांना विनंती


एएमसी मिरर : वेब न्यूज
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी भाजपासोबत आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्याच सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे, मात्र मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावले, तसे यावेळी करू नका, अशा मिश्किल शब्दांत उदयनराजे भोसले यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर इतक्या केसेस कशा आहेत, असे मला निवडणूक आयोगाने विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले मला अन्याय सहन होत नाही. माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा मी त्यांचा मुख्यप्रचारक म्हणून काम करतो, असेही ते यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी त्यांनी आपण लोकसभा पोटनिवडणुकासाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post