शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन : उदयनराजे


एएमसी मिरर : वेब न्यूज
शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन, असे वक्तव्य खुद्द उदयनराजे भोसले यांनी केले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असून उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवारी करणार याबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच शरद पवार यांच्याबाबत बोलताना उदयनराजे यांनी भावूक होऊन केलेल्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे.
शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असेही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post