उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी


एएमसी मिरर : वेब न्यूज
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भाजप व शिवसेना युती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील राजकीय वातावरण पाहता पुन्हा एकदा महायुती सत्तेत येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ आहेत, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मुंबईतल्या मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते .
मेट्रोचं जाळं पसरवण्याचा श्रीगणेशा गणेशोत्सवात केला जातो आहे. यामुळे मुंबईतल्या पायाभूत सुविधांना नवे आयाम प्राप्त होतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई असं शहर आहे ज्या शहराने संपूर्ण देशाला गती दिली, असेही मोदी म्हणाले.
तसेच या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणत कौतुक केले. तसेच उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘लहान भाऊ’ असा केला. तसेच सगळ्या उपस्थितांना गणेश उत्सवच्या शुभेच्छाही दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post