लोकसभेवेळीच ठरलाय युतीचा फॉर्म्युला : उद्धव ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभा जागापाटपाचा निर्णय लवकरच कळवू. १३५-१३५ फॉर्म्युला फक्त मीडियाने पसरवला. दोन दिवसांत युतीची घोषणा करु, अशी माहिती शिवसेना प्रमुख उध्दव ठकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील ५ वर्षात सेनेने सरकारला धोका दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासकामांना आम्ही कायम पाठिंबा दिला. तो सरकारला तर दिलाच पण जनतेच्या विकासालाही पाठिंबा दिला. आरेतील वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी नमूद केले. अयोध्या प्रश्नी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आता कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post