मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 'मास्टर स्ट्रोक'; उदयनराजे अखेर भाजपात


एएमसी मिरर : वेब न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. उदयनराजे यांनी आपला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
उदयनराजेंनी भाजप प्रवेशानंतर जनतेला साद घातली आहे. राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन, असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post