‘युनिव्हर्सल’चा पहिला प्लांट नगरमध्ये : संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
आयटी संदर्भात उत्पादन करणारी युनिर्व्हसल सिक्युरिटी सिस्टीम कंपनीचा पहिला प्लांट नगरात सुरू झाला आहे. आज त्याची मशीनरी बसविण्यात आली. या कंपनीमुळे नगरमध्ये आणखी शंभर तरुणांना नोकरीची संधी मिळणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
आयटी पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बायोमेट्रीक क्षेत्रात बारकोडच्या पुढील टेक्नीक नगरच्या या प्लांटमध्ये तयार केले जाणार आहे. रेडिओ फ्रिकव्हेंसी आयडंटीफिकेशन डिव्हास निर्माण करणार्‍या मशीनरी आज नगरच्या आयटी पार्कमध्ये बसविण्यात आल्या. देशभरातील पहिला प्लांट कंपनीने नगरात उभारला आहे. याशिवाय अमेरिकेची मोर्गेस प्रोसेस आणि ऑस्ट्रेलियन इन्शुन्स कंपनीचे प्लांटही आज आयटी पार्कमध्ये सुरू झाले. सोमवारपासून युनिर्व्हसला कंपनीचे कामकाज प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या कंपनीत किमान शंभर नोकरदारांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रियादेखील सोमवारपासून सुरू होईल असे आ.जगताप यांनी सांगितले. राजेश आठरे, शशी घिगे, शुभम घिगे, शुभम गांधी, साहिल सचदेव, गौरव नय्यर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post