एएमसी मिरर : वेब न्यूज
एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यांना मी शुभेच्छा देतो. लोकसभेत आम्ही युती धर्म पाळला. आज आमचे राजकीय संबंध तुटले असले तरी वैयक्तिक संबंध कायम राहतील. आता आम्ही संपूर्ण २८८ जागा लढवणार असून आता कुणाशीही युती करणार नाही. तसेच ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्यांशी वाटाघाटी होतील. अनेक मुस्लिम संघटना माझ्या सोबत आहेत, शिवाय शेतकरी संघटना, सीपीआय, सीपीएम, सत्यशोधक पार्टी, वामनराव चटप यांच्यांशी आमची आघाडी कायम राहील. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर शहरात आले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आंबेडकर म्हणाले की, गंगू तेली आणि राजा भोज हे विधान मी
कॉंग्रेसला उद्देशून केले होते, पण त्याला चुकीच्या पध्दतीने समोर आणलं.
एका सर्व्हे नूसार देशातील ३३ हजार कुटुंबे अशी आहेत ज्यांची स्थावर
मालमत्ता शंभर ते पाचशे कोटी रुपये आहेत. हे लोक बेरोजगारी आणि देशातील
अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहेत, पण सध्या ते स्थलांतरीत झाले आहेत.
त्यामुळे देशात आर्थिक मंदी आहे, व्यापारी भितीपोटी व्यवसाय करायला तयार
नाहीत, हीच या सरकारची शंभर दिवसातली उपलब्धी असल्याची टिका त्यांनी केली.
Post a Comment