वंचित बहुजन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता


एएमसी मिरर : वेब न्यूज 
लोकसभा निवडणुकीत लाखांची मते घेऊन आघाडी घेणा-या वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या अपेक्षा असल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे. तर वंचितने त्यांना फक्त 8 जागांची ऑफर दिली आहे. तथापि एमआयएम जास्तीत-जास्त 75 जागांवर समझौता करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतादारांना एकत्रव आणण्यसाठी एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन औेवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा जिंकली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा खाते उघडले. मात्र प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता.
यानंतर भारिपला मुस्लिम मतांचा फायदा होत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे मत बनले आहे. मुस्लिम एमआयएम नव्हे तर मौलांनांच्या प्रभावाखाली असल्याचे आंबेडकर यांना वाटते. तर विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी  करण्याची एमआयएमला अपेक्षा आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेतून जास्तीत जास्त 75 जागापर्यंत आघाडी मान्य करेल. मात्र प्रकाश आंबेडकरांनी खासदार असदुद्दीन औवेसी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. राज्यात आमची ताकद असून मागील विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर आमचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. त्यामुळे खासदार औवेसी यांच्याकडून अद्याप निरोप आलेला नाही. तो निरोप
आल्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू, असे जलील यांनी सांगितले.
वंचितने काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीला सोडून वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार आहे. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीशी असलेली आघाडी तोडावी लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post