एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली दुसरी यादी
जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 180 उमेदवारांची घोषणा करण्यात आली
आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार
परिषद घेऊन माहिती दिली.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या
पक्षाची भूमिका स्पष्ट केली. वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकांसाठीच्या
288 जागा लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर लगेचच दुसरी यादी
जाहीर करण्यात आली. याआधी वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवारांची घोषणा केली
होती. आज 180 उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केल्या नंतर उरलेल्या जागांची
यादी मंगळवारी जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवेळी वंचितकडून लढणाऱ्या पडळकर यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षामध्ये मध्ये प्रवेश केला. त्यावरून प्रश्न विचारला असता, पडळकर हे निवडणुकीनंतर परत वंचितकडे परततील अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. तसेच लक्ष्मण माने यांनी निर्णय घेण्याची घाई केल्याचेही ते यावेळी म्हणाले. आमचा पक्ष सर्वांसाठी खुला आहे. जे कुणी आमच्या पक्षात येतील त्यांना आम्ही आमचे विचार पटवून देऊ, असेही ते म्हणाले.

Post a Comment