अमित शहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा पूर्वनियोजित 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना युतीची घोषणा होण्याची शक्यताही आता मावळलीअसल्याचे चित्र आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीतही युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. लोकसभेला अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभेसाठीही शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होणार अशी चर्चा सुरु होती. पण शाहांचा दौरा रद्द झाल्यामुळे युतीचे काय? हा प्रश्न कायमच आहे. शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या १०-१२ जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर टाकण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post