'आप' महाराष्ट्रात लढवणार ५० जागा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या ५० जागा लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने (आप) घेतला असून यात मुंबईतील तीन जागांचा समावेश आहे, असे आपच्या नेत्या प्रीती शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निवडणुकीत 'आप'ला घवघवीत यश मिळणार असून आप पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसेल, असा दावाही त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती आपचे सचिव धनंजय शिंदे यांनी दिली.
आपच्या पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश आहे. यात जोगेश्वरी पूर्वमधून विठ्ठल लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीमधून दिलीप तावडे यांना 'आप'ने मैदानात उतरवले आहे. पुण्यातील पर्वतीमधून संदीप सोनावणे, चंद्रपूरमधील ब्रम्हपुरीतून पारोमिता गोस्वामी, कोल्हापूरमधील करवीरमधून आनंद गुरव, नाशिकमधील नांदगावमधून विशाल वाडघुले, आणि कोथरूडमधून अभिजित मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post