अमित शहा 26 सप्टेंबरला पुन्हा मुंबईत; युतीबाबत निर्णय शक्य


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात याबाबत घोषणा होईल, असे बोलले जात होते. मात्र, येत्या २६ सप्टेंबरला अमित शहा पुन्हा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागावाटप निश्चित होऊन, अमित शहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपकडून शिवसेनेला १२० ते १२६ जागांची ऑफर दिली गेली आहे. मात्र, शिवसेनेला भाजपची ही ऑफर मान्य नाही. शिवसेना आणखी १० ते १५ जागांसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसात जागा वाटपावर तोडगा निघून अंतिम फॉर्म्युला समोर येऊ शकतो. २६ सप्टेंबरला अमित शाह यांचा पूर्वनियोजित दौरा असून, जागावाटप अंतिम झाल्यास अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post