अहमदनगर : नगरसेवक श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात?


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत असतानाच आता अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्जही घेतला आहे.
काही पक्षांशी उमेदवारीबाबत चर्चा सुरू असून पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे श्रीपाद छिंदम यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी छिंदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावेळी ते भाजप नगरसेवक व उपमहापौर होते. त्यानंतर झालेल्या मनपा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले आहेत. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post