विधानसभेसाठी 495 कोटींचे बजेट; नगरला २१ कोटी प्राप्त


एएमसी मिरर : नगर
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 495 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करून हा निधी प्रत्येक जिल्ह्याला पाठविला आहे. यात नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघासाठी 21 कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.
2019-20 या आर्थिक वर्षात विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मंजूर करण्यात आलेल्या बजेटनुसार असणारा निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना वितरित करण्यात आला असून यातून निवडणुकीसाठी आवश्यक असणारा खर्च भागविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

जून महिन्यांत सरकारने निवडणुकीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना 72 कोटींचा निधी दिला होता. आता निवडणूक प्रक्रिया पारपडण्यासाठी 423 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून नगर जिल्ह्याला जून महिन्यांत 3 कोटी आणि आता 18 कोटी अशा प्रकारे 21 कोटी रुपयांचा निधी निवडणूक कामासाठी उपलब्ध झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post