Vidhansabha2019 : एमआयएमची दुसरी यादी जाहीर


एएमसी मिरर : वेब न्यूज
वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज चार मतदारसंघांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात सोलापूरच्या दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित केले आहेत. यामुळे आता वंचित बहुजन आघाडीसमोर एमआयएमचे आव्हान राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडीतून पडण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे खासदार जलील यांनी ११ सप्टेंबरला विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज त्यांनी चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे.
सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post