'वंचित'च्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उमेदवारांच्या समाज-जातीचाही उल्लेख आहे. यादीत कोल्हापूर, सांगली, पुणे, विदर्भ, लातूर, जळगाव आणि नगरमधील जागांचा समावेश आहे. दरम्यान, एमएमआयने औरंगाबाद आणि सोलापूरमधील त्यांच्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत. वंचितच्या या पहिल्या यादीत औरंगाबाद आणि सोलापूरमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आघाडी होण्यासाठी वंचित अजूनही वाट पाहात असल्याची चिन्हे दिसत आहेत.
वंचितच्या पहिल्या यादीत ढीवर, नंदीवाले, काची-राजपूत, छप्परबंद, माना, पटवे-मुस्लिम, माडिया, मनियार आणि भिल्ल आदी वंचित समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. यात दोन डॉक्टर आहेत.

विधानसभेसाठी वंचितकडून हे 22 उमेदवार लढणार
 1. सुरेश जाधव, शिराळा मतदारसंघ

 2. डॉ. आनंद गुरव, करवीर मतदारसंघ

 3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ

 4. बाळकृष्ण शंकर देसाई, दक्षिण कराड मतदारसंघ

 5. डॉ. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव मतदारसंघ

 6. दीपक शामदिरे, कोथरूड मतदारसंघ

 7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर मतदारसंघ

 8. मिलिंद काची, कसबापेठ मतदारसंघ

 9. शहानवला जब्बारशेख, भोसरी मतदारसंघ

 10. शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर मतदारसंघ

 11. किसन चव्हाण, पाथर्डी शेवगाव मतदारसंघ

 12. अरुण जाधव, कर्जत जामखेड मतदारसंघ

 13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा मतदारसंघ

 14. चंद्रलाल मेश्राम, ब्रह्मपुरी मतदारसंघ

 15. अरविंद सांडेकर, चिमूर मतदारसंघ

 16. माधव कोहळे, राळेगाव मतदारसंघ

 17. शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव मतदारसंघ

 18. लालूस नागोटी, अहेरी मतदारसंघ

 19. मणियार राजासाब, लातूर शहर मतदारसंघ

 20. नंदकिशोर कुयटे, मोर्शी मतदारसंघ

 21. अॅड. आमोद बावने, वरोरा मतदारसंघ

 22. अशोक गायकवाड, कोपरगाव मतदारसंघ

Post a Comment

Previous Post Next Post