दहशतवादी हल्ल्याचे सावट; दक्षिण भारतात सर्तकतेचा इशारा


एएमसी मिरर : वेब न्यूज
केरला मधील सर क्रीक भागातून काही रिकाम्या सोडून देण्यात आलेल्या संशयित अवस्थेतील बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला घडण्याची शक्यता भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल एसके सैनी (जीओसी, दक्षिण कमांड) यांनी वर्तवली आहे.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आम्ही दहशतवादी कारवायांना उलथवून लावण्यासाठी सज्ज असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले.
केरळचे पोलीस महासंचालक लोकनात बहेरा यांनी म्हटले आहे की, भारतीय सेनेकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचेही आदेश दिले गेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post