विधानसभा निवडणूक काळात शस्‍त्र बाळगण्‍यास मनाई


एएमसी मिरर : नगर 
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर प्रत्‍यक्ष मतदान घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरपर्यंत परवानाधारक शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन त्यांनी दिनांक २१ सप्‍टेंबर २०१९ पासून ते दिनांक २७ ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत अहमदनगर जिल्हा महसूल स्‍थळसिमेच्‍या हद्दीत कोणाही इसमास निवडणूक काळात शस्‍त्र परवान्‍यावरील शस्‍त्रेजवळ बाळगून फिरण्‍यास व सार्वजनिक ठिकाणी बाळगण्‍यास मनाई केली आहे.
शासनाच्‍या सेवेतील व्‍यक्‍तींना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांच्या आदेशानुसार कर्तव्‍यपुर्तीसाठी हत्‍यार जवळ बाळगणे आवश्‍यक आहे, अशा व वित्‍तीय संस्‍था, बँका यांना सुरक्षा कारणास्‍तव अधिकृत हत्‍यार जवळ बाळगणे आवश्‍यक आहे अशांसाठी हा आदेश लागू होणार नाही, असे प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post